वॉशिंग्टन :भारताने ५९ चिनी अॅप्स बॅन केल्यानंतर, आता अमेरिकादेखील तसेच पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. देशाचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पॉम्पेओ यांनी याबाबत माहिती दिली.
देशाची सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी भारत सरकारने गेल्याच आठवड्यात चीनच्या ५९ अॅप्सना बॅन केले होते. यामध्ये लोकप्रिय अशा टिकटॉक, यूसी ब्राऊझर आणि वुईचॅटचाही समावेश होता.
भारताने या अॅप्सवर बंदी घातली आहे, तसेच ऑस्ट्रेलियाही असे करण्याचा विचार करत आहे. त्यामुळेच, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि मी गांभीर्याने याबाबत चर्चा करत आहोत, अशी माहिती पॉम्पेओ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली.