वाशिग्ंटन- गृहयुद्धात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेने श्रीलंकेचे लष्करप्रमुख शावेंद्रा सिल्वा यांच्यावर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी ही माहिती दिली. शावेंद्रा सिल्वा यांनी 2009 च्या गृहयुद्धात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचे माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.
मानवी हक्कांचे उल्लंघन; अमेरिकेने श्रीलंकन लष्करप्रमुखांवर लादले निर्बंध - अमेरिकेने श्रीलंकेचे लष्करप्रमुखांवर लादले निर्बंध
गृहयुद्धात मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेने श्रीलंकेचे लष्करप्रमुख शावेंद्रा सिल्वा यांच्यावर निर्बंध लादले आहेत.
निर्बंध लादल्यामुळे श्रीलंकेचे लष्कर प्रमुख शावेंद्रा सिल्वा आणि त्यांच्या कुटुंबीयांना अमेरिकेत प्रवेश नाही. सिल्वा यांनी 2009 मध्ये जाफना प्रायद्वीपमध्ये लष्कारावरील कारवाईदरम्यान अनेक नागरिकांना मारले होते. याप्रकरणी संयुक्त राष्ट्र आणि संस्थाकडे पुरावे आहेत. जगामध्ये मानवी हक्कांना म्हत्व आहे. त्यामुळे सिल्वा यांना पुन्हा सेना प्रमुखपदी निवड केल्याचे आम्ही समर्थन करू शकत नाही, असे माइक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे.
2019 मध्ये राजपक्षे बंधू सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी सिल्वा यांची सेनाप्रमुखपदी बढती केली. यापूर्वी ते सेनेमध्ये 58 विभागाचे प्रमुख होते. तेव्हा त्यांच्या विभागातील सेना तुकडीने 2009 मध्ये तामिळ वाघांना (लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम्- एलटीटीई) पराभूत करत उत्तरेकडील जाफना द्वीपकल्पावर ताबा मिळवला होता. तेव्हा तमिळ नागरिकांना ओलीस ठेवून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप सिल्वा यांच्या सेना तुकडीवर आहे.