वाशिंगटन/सेऊल -गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. याबाबत बोलताना अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्या तब्येतीबाबत सध्या आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. कदाचित ते गंभीर आजारी आहेत. मात्र, त्यांच्या राजवटीत काय घडत आहे, यावर आम्ही नजर ठेवून असल्याचे पोम्पीओ यांनी म्हटले आहे.
सिओलस्थित योनहॅप न्यूज एजन्सीने बुधवारी पोम्पीओ यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उनच्या तब्येतीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत काहीही बोलण्याचे टाळले. “आम्ही त्यांना पाहिले नाही.” आज आमच्याकडे याबाबत देण्यासाठी कोणतीही माहिती नाही. मात्र, आम्ही फक्त अध्यक्ष किम जोंगवरचच नव्हे तर उत्तर कोरियाच्या आतील भागात काय चालले आहे याचा मागोवा ठेवून त्याची बारकाईने पाहणी करत आहोत, असे पोम्पीओ म्हणाले,
यासोबतच, पोम्पीओ यांनी उत्तर कोरियाच्या नागरिकांना कोरोनापासून होणारा धोकादेखील नोंदविला आहे. कम्युनिस्ट राजवटीमुळे येथे कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, या देशातदेखील कोरोनाचा उद्रेक झाल्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. तसेच, योम्हॅप न्यूज एजन्सीबरोबर झालेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर कोरियामध्येही दुष्काळ, अन्नाची कमतरता असा धोका निर्माण होण्याचा खरोखर धोका असल्याचे नमूद केले आहे.