महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव; फ्रान्स, ब्रिटनचा पाठिंबा - China

मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास गेल्याच महिन्यात चीनने नकाराधिकाराचा वापर केला होता. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'जैश'ने स्वीकारली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मसूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

मसूद अजहर

By

Published : Mar 28, 2019, 11:47 AM IST

वॉशिंग्टन- 'जैश-ए-मोहंमद'चा म्होरक्या मसूद अजहरला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव मांडला आहे. अमेरिकेच्या या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटन या दोन्ही देशांनीही पाठिंबा दिला आहे. मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास गेल्याच महिन्यात चीनने नकाराधिकाराचा वापर केला होता.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी 'जैश'ने स्वीकारली होती. गेल्या अनेक दिवसांपासून मसूदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने प्रस्ताव मांडला होता. मात्र, चीनने नकाराधिकाराचा वापर करत चीनला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास नकार दर्शविला होता. आता अमेरिकेच्या प्रस्तावाला फ्रान्स आणि ब्रिटनने मंजुरी दिली आहे.

पुलवामा हल्ल्याचा निषेध करत मसूदला काळ्या यादीत टाकण्याची अमेरिकेने केली आहे. या यादीमध्ये अल-कायदा आणि इस्लामिक स्टेट (आयसिस)सारख्या संघटनांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details