महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'कोरोनाग्रस्तांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याचं प्रमाण जास्त' अमेरिकेतील डॉक्टरांकडून अभ्यास सुरु - Coronavirus crisis

'रक्ताच्या गाठी थांबविण्यासाठी औषधे दिली तरी रुग्णांमध्ये गाठी होणं थांबत नाही. हे असामान्य आहे. या रुग्णांमध्ये फायब्रोजिन या चिकट प्रथिनाचे प्रमाण जास्त आढळून येते'.

कोरोना
कोरोना

By

Published : Jun 4, 2020, 8:21 PM IST

Updated : Jun 4, 2020, 9:22 PM IST

हैदराबाद -कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी जास्त होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अमेरिकेतील एमरॉय विद्यापीठातील डॉक्टरांनी याचा अभ्यास सुरु केला आहे. हायपर व्हिस्कॉसिटी म्हणजेच रक्ताच्या जाडीचा(थिकनेस) सुज, आणि गाठींशी संबध असावा असे मत विद्यापीठातील डॉक्टरांनी मांडले आहे.

कोरोना रुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे दिसून येते हे गुढ आहे. फक्त कोरोनाचाचणी पलिकडे जाऊन असे का घडत असावे याचा आम्ही विचार केला, असे विद्यापीठातील डॉक्टर चेरिल मायर यांनी सांगितले. एमरॉय विद्यापीठातील रुग्णालयात दाखल झालेल्या 15 रुग्णांमध्ये आम्हाला सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा जास्त रक्त गोठल्याचे दिसून आले. जास्त आजारी असणाऱ्या रुग्णामध्ये तर जास्त रुक्त गोठल्याचे आणि रक्ताच्या गाठी झाल्याचे दिसून येते, असे मायर यांनी सांगितले.

रक्तांच्या गाठी आणि शरिरावर सुज

रक्ताच्या गाठी थांबविण्यासाठी औषधे दिली तरी रुग्णांमध्ये गाठी होणं थांबत नाही. हे असामान्य आहे. या रुग्णांमध्ये फायब्रोजिन या चिकट प्रथिनाचे प्रमाण जास्त आढळून येते. या प्रथिनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया जलद होते. त्यामुळे आम्ही रक्तांची घनता तपासण्यास सुरुवात केली. हाती येणाऱ्या निष्कर्षातून दुसरी उपचार पद्धती शोधून काढण्यासाठी आमचे पथक काम करत आहे, असे मायर यांनी सांगितले.

Last Updated : Jun 4, 2020, 9:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details