महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकेचे सडेतोड उत्तर, सायबर हल्ला करून इराणचे केले मोठे नुकसान

अमेरिकन वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे रॉकेट आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणात वापरल्या जाणाऱ्या संगणकांचे यात मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

By

Published : Jun 23, 2019, 9:39 PM IST

डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन - इराणने अमेरिकेचे टेहळणी करणारे ड्रोन पाडल्यानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला करून करून प्रत्युत्तर देण्याची तयारी केली होती. मात्र, हा विचार रद्द करून अमेरिकेने इराणला धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर सायबर हल्ले चढवले आहेत. इराणच्या क्षेपणास्त्र नियंत्रण प्रणाली आणि एका गुप्तहेर यंत्रणेवर हे हल्ले करण्यात आले आहेत.

अमेरिकन वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे रॉकेट आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणात वापरल्या जाणाऱ्या संगणकांचे यात मोठे नुकसान झाले आहे. मात्र, अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र, गुप्तहेर संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आणखी एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने हे वृत्त प्रकाशित केले आहे. अमेरिकेने जहाजांवर नजर ठेवणाऱ्या एक गुप्तहेर यंत्रणेलाही लक्ष्य केले आहे. इराणने नुकतेच या ठिकाणाहून २ वेळा त्यांच्या तेलाच्या टँकरवर हल्ले केले होते, असा आरोप अमेरिकेने केला आहे.

इराणच्या अणू करारातून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर या दोन्ही देशांदरम्यान तणावास सुरुवात झाली होती. गुरुवारी इराणने अमेरिकेचे मानवरहित टेहळणी ड्रोन पाडले होते. या ड्रोनने इराणच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन केल्याचा दावा इराणने केला होता. या हल्ल्यानंतर अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत इराणवर कडक टीका करून नाराजी व्यक्त केली होती. यानंतर ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचे संकेत दिले होते. मात्र, हल्ल्याच्या केवळ १० मिनिटे आदी हा निर्णय रद्द करण्यात आला. यानंतर ट्रम्प यांनी इराणवर पुढील आठवड्यात मोठे प्रतिबंध लावण्यात येतील, असे सुतोवाच त्यांनी शनिवारी केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details