वॉशिंग्टन: जगभरातील बहुतांश देशांमध्ये आता कोरोनापूर्व परिस्थिती परतत आहे. अमेरिकाही यात मागे राहिली नसून, आता पूर्ण लसीकरण झालेल्यांना देशात मास्कची सक्ती नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या व्यक्तींना घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही मास्क वापरणे अनिवार्य नसणार आहे.
"आजचा दिवस हा अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचा आहे. जर तुमचे पूर्ण लसीकरण (दोन्ही डोस) झाले असेल, तर तुम्हाला मास्क वापरण्याची गरज नाही" असे राष्ट्राध्यक्ष बिडेन म्हणाले. ते रोज गार्डनमधून लोकांना संबोधित करत होते. या भाषणावेळी त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मास्क घातला नव्हता. यावेळी त्यांनी नागरिकांनाही लवकरात लवकर लस टोचून घेण्याचे आवाहन केले. लसीकरण पूर्ण होईपर्यंत मास्क वापरणे सुरू ठेवा, असेही त्यांनी नागरिकांना सांगितले.