महाराष्ट्र

maharashtra

US Capitol clash : चार आंदोलकांचा मृत्यू तर ५० जण ताब्यात

By

Published : Jan 7, 2021, 12:31 PM IST

अमेरिकेच्या संसदेवर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्लाबोल केला. आंदोलक आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

US unrest
संसदेवर हल्ला

वॉशिग्टन डी. सी - अमेरिकेच्या संसदेवर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी हल्लाबोल केला. आंदोलक आणि पोलिसांच्या धुमश्चक्रीत चार आंदोलकांचा मृत्यू झाला असून ५० पेक्षा जास्त जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी संसदेचे बॅरिकेडस् तोडत आत प्रवेश मिळवला. तसेच आतील सामानाची तोडफोड केली.

विशेष अधिवेशन सुरू असताना आंदोलकांचा हल्लाबोल-

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन

रिब्लिकन पक्षाचे नेते जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला असून जानेवारी २० ला ते शपथ घेणार आहेत. मात्र, ट्रम्प यांनी या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून मतांची अफरातफर झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, जो बायडेन यांच्या विजयावर कायदेशीर शिक्कामोर्तब करण्यासाठी युएस कॅपिटोल इमारत म्हणजेच अमेरिकेच्या संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात आले होते. त्याच वेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेबाहेर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीतील ट्रम्प समर्थकांनी संसदेत राडा केला. जगभरातून या घटनेचे प्रतिसाद उमटत आहेत.

मी कधीही हार मानणार नाही - ट्रम्प

निवडणुकीत मतांची अफरातफर झाली असून ट्रम्प यांनी हार पत्करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प यांनी बुधवारी रॅली आयोजित केली होती. यावेळी काही समर्थकांनी संसदेवर चाल केली. ट्रम्प यांनी आंदोलकांना खास असे संबोधले. तसेच संसदेतून बाहेर निघण्याचे आवाहन केले.

जगभरातील नेत्यांनी केला निषेध -

अमेरिकेच्या संसदेवरील हल्ल्याचा जगभरातील नेत्यांनी निषेध केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून या हिंसाचाराचा निषेध केला आहे. लोकशाही देशातील सत्तातर शांततापूर्ण मार्गाने व्हायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनीही या घटनेचा निषेध केला.

ABOUT THE AUTHOR

...view details