महाराष्ट्र

maharashtra

US Capitol clash: अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प समर्थकांचा राडा

By

Published : Jan 7, 2021, 7:10 AM IST

Updated : Jan 7, 2021, 8:55 AM IST

अमेरिकेच्या संसदेत सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये संसदेबाहेर संघर्ष उफाळला आहे.

पोलीस आंदोलकांना हुसकाऊन लावताना
पोलीस आंदोलकांना हुसकाऊन लावताना

वॉशिंग्टन डी. सी - अमेरिकेच्या संसदेत सत्तांतराची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि पोलिसांमध्ये संसदेबाहेर संघर्ष उफळला आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन बुधवारी बोलविण्यात आले होते. मात्र, यावेळी ट्रम्प समर्थकांनी संसदेबाहेर (यूएस कॅपिटॉल हील) राडा घातला. संसदेत घुसण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यांना बळाचा वापर करून रोखले.

संसदेबाहेर ट्रम्प समर्थकांचा राडा

फेसबुक, इस्टाग्राम आणि ट्विटरची ट्रम्प यांच्या सोशल मीडिया अकांऊटवर कारवाई

संसदेबाहेर जमलेले ट्रम्प समर्थक

फेसबुक, इस्टाग्राम आणि ट्विटरने नियमांचे उल्लंघन केल्याच ठपका ठेवत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट काही काळासाठी बंद केले आहे. २४ तासांसाठी ट्रम्प यांचे इस्टाग्राम खाते बंद करत असल्याची घोषणा इस्टाग्रामचे प्रमुख अ‌ॅडम मॉझेरी यांनी केले आहे. फेसबुकने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ट्रम्प यांचे व्हिडिओ काढून टाकले आहेत. तर ट्विटरनेही ट्रम्प यांच्या पोस्ट काढून टाकल्या आहेत.

मी कधीही हार मानणार नाही - ट्रम्प

छायाचित्र

अमेरिकेन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. तर डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजयी झाले. २० तारखेला बायडेन राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, निवडणुकीत मतांची अफरातफर झाली असून ट्रम्प यांनी हार पत्करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या संसदेबाहेर ट्रम्प यांनी बुधवारी रॅली आयोजित केली होती. यावेळी काही समर्थकांनी संसदेवर चाल केली. त्यांना पोलिसांनी विरोध केला. ट्रम्प समर्थकांना संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

संसदेबाहेर जमलेले ट्रम्प समर्थक

संसद परिसरात एका महिलेचा मृत्यू

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आंदोलकांनी लोखंडी बॅरिकेट्सची तोडफोड केली. तसेच संसदेत घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या दंगलविरोधी पथकाने या समर्थकांना बाहेर हुसकावण्यासाठी गोळीबारही केला. टिअर गॅस, शॉक गनचा वापर करून पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. संसदेबाहेर एका महिलेचा मृत्यू झाल्याचीही माहिती मिळत आहे.

हातात झेंडे घेवून आंदोलकांचा संसदेत घुसण्याचा प्रयत्न

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यानंतर संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्यात येते. ही खुप सर्वसामान्य प्रक्रिया असून यात कोणताही गोंधळ होत नाही. या अधिवेशनात हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह आणि काँग्रेसच्या सदस्यांचा सहभाग असतो. जो बायडेन यांचा विजयावर कायदेशीर शिक्कामोर्तब करण्यासाठी अधिवेशन बोलविण्यात येत होते. मात्र, त्यात ट्रम्प समर्थकांनी राडा घातला. त्यामुळे अनेक नेते सभागृहातच अडकून पडले आहेत.

Last Updated : Jan 7, 2021, 8:55 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details