महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Russia Ukraine Crisis : UNSC मध्ये युक्रेनचा प्रश्न ऐरणीवर; रशियावरील ठरावावर आज मतदान - UNSC मध्ये युक्रेनवर चर्चा

रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले आहे. पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली. सुरक्षा परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना घेरण्याची तयारी सुरू आहे. यासंबंधीचा प्रस्ताव युएनएससीमध्ये मांडण्यात (UNSC vote on resolution on Russia) येणार आहे. त्यावर आज मतदान होणार याहे.

युएनएससी
UNSC

By

Published : Feb 25, 2022, 10:35 AM IST

न्यूयार्क - रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व देश उभे राहिले आहेत. यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देश असलेल्या अमेरिकेने रशियाच्या हालचालीचा निषेध केला आहे. रशियाच्या या निर्णयाचा त्याच्या मित्र राष्ट्रांनीही निषेध केला आहे. रशियाचे हे पाऊल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी वर्णन केले आहे. आता सुरक्षा परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना घेरण्याची तयारी सुरू आहे. यासंबंधीचा प्रस्ताव युएनएससीमध्ये मांडण्यात (UNSC vote on resolution on Russia) येणार आहे. त्यावर आज मतदान होणार याहे. त्याचबरोबर परिषदेत भारतासह इतर अनेक देशांनी युक्रेनच्या मुद्द्यावर बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत संयम बाळगण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.

रशियाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पूर्व वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार आहे. याआधी, युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईनंतर अमेरिका यूएनमध्ये मॉस्कोविरुद्ध ठराव तयार करत असल्याचे वृत्त समोर आले होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे युरोप खंडातील शांतता बिघडली आहे, असे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (नाटो) चे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी म्हटलं. स्टोल्टनबर्ग यांनी शुक्रवारी नाटो युतीच्या नेत्यांची शिखर परिषद बोलावली आहे.

पुतीन यांच्या निर्णयाचा अमेरिकेने निषेध नोंदवला आहे. रशियाच्या या निर्णयावर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनी चांगलेच संतापलेले दिसत आहेत. अमेरिका आणि ब्रिटननेही रशिया आणि युक्रेन या दोन्ही प्रदेशांवर कडक निर्बंध लादण्यास सुरवात केली.

युक्रेनचे महत्त्व -

युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होऊ शकते.

हेही वाचा -Russia Ukraine Crisis Live Updates : युद्धाच्या पहिल्या दिवशी 137 जणांचा मृत्यू; मोदी-पुतिनमध्ये चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details