महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिका भूतानला देणगीस्वरूपात देणार 15 अत्याधुनिक व्हेंटिलेटर - अमेरिका भूतान संबंध न्यूज

'भूतानला ही मदत देताना अमेरिकेला आनंद होत आहे. हे व्हेंटिलेटर्स यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) च्या माध्यमातून वितरित केले जातील, असे भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ आय. जस्टर यांनी सांगितले. कोविड - 19 ची साथ रोखण्यासाठी मदतीच्या प्रयत्नांच्या समर्थनार्थ एप्रिलमध्ये भूटान फाऊंडेशनला देण्यात आलेल्या 10 लाख डॉलर्सच्या देणगीचा हा भाग आहे, असे ते म्हणाले.

अमेरिका भूतान संबंध न्यूज
अमेरिका भूतान संबंध न्यूज

By

Published : Nov 27, 2020, 7:59 PM IST

वॉशिंग्टन/ नवी दिल्ली - अमेरिका कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठी भूतानला मदत करण्यासाठी तेथील शाही सरकारला 15 नवीन अत्याधुनिक व्हेंटिलेटर देणगी स्वरूपात देणार आहे, अशी घोषणा अमेरिकन सरकारने केली.

'भूतानला ही मदत देताना अमेरिकेला आनंद होत आहे. हे व्हेंटिलेटर्स यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) च्या माध्यमातून वितरित केले जातील, असे भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ आय. जस्टर यांनी सांगितले. 'आम्ही आमच्या देशांदरम्यानच्या सहकार्यासाठी उत्सुक आहोत आणि कोविड-19 साथीविरोधात आम्ही एकत्र काम करत आहोत,' असे ते म्हणाले.

हेही वाचा -ब्रिटनमध्ये 24 तासांत 696 मृत्यू, 5 मेपासूनची कोरोनाच्या बळींची सर्वाधिक आकडेवारी

हे व्हेंटिलेटर आटोपशीर, छोट्या आकाराचे आहेत. त्यांची सहज जोडणी करता येऊ शकते. ते कोविड-19 च्या रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी मदत करतील. व्हेंटिलेटर व्यतिरिक्त यांच्या वॉरंटीसह एका सहाय्यक पॅकेजला यूएसएआयडी वित्तपुरवठा करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

कोविड - 19 ची साथ रोखण्यासाठी मदतीच्या प्रयत्नांच्या समर्थनार्थ एप्रिलमध्ये भूटान फाऊंडेशनला देण्यात आलेल्या 10 लाख डॉलर्सच्या देणगीचा हा भाग आहे.

या देणगीत भूतानला कोविड - 19 च्या साथीच्या आजाराशिवाय आर्थिक सुधारणा करण्यात मदत करण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांच्या सहाय्य उपक्रमांचा देखील समावेश आहे. भूतान फाउंडेशनच्या सहकार्याने कोविड - 19 चा प्रसार रोखण्यासाठी सप्टेंबरमध्ये यूएसएआयडीने वृद्ध आणि गर्भवती महिलांसह गरीब समाजात वितरणासाठी भूतानच्या आरोग्य मंत्रालयाला 2 लाख कापडी मास्कचे वितरण केले होते.

हेही वाचा -अमेरिकेत कोरोनाचे बळी 2.6 लाखांवर, मार्च 2021 पर्यंत 4.7 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज

ABOUT THE AUTHOR

...view details