संयुक्त राष्ट्र - कोविड - 19 ची लस उपलब्ध झाल्यावर आपण जाहीरपणे ही घेऊ, असे संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुतारेस यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते ही लस घेणार का, असे विचारले असता, गुतारेस यांनी 'मला ही लस उपलब्ध असेल, तेव्हा मी ती नक्कीच घेईन आणि मी निश्चितच लस जाहीरपणे घेईन,' असे म्हटले आहे.
हेही वाचा -कोविड-19 विषयी युएनजीएचे विशेष सत्र, 100 हून अधिक नेते करणार संबोधित
सिन्हुआच्या वृत्तानुसार गुतारेस यांनी प्रत्येकाला लसीकरण करून घेण्यास प्रोत्साहित केले. 'ही लस पोहोचताच मी सर्वांना लसी घेण्यास प्रोत्साहित करतो. कारण ही एक सेवा आहे. आपल्यातील प्रत्येकास संपूर्ण समुदायाच्या सेवेसाठी लस दिली जाते. जेणेकरून या रोगाचा प्रसार होण्याचा धोका राहू नये. म्हणून, माझ्यासाठी लसीकरण हे एक नैतिक कर्तव्य आहे,' असे ते म्हणाले.
आफ्रिकन देशांच्या कर्जमुक्तीच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पोहोच वाढवण्यासाठी स्वतःच केलेल्या आवाहनाचा गुतारेस यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, बहुतेक आफ्रिकन देशांकडे कोविड - 19 च्या संकटाला सामोरे जाण्यासाठी निधीचा अभाव आहे. कारण त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या निर्यातीची मागणी घटल्याने किमती खाली आल्या आहेत.
हेही वाचा -बनावट लसींचा धोका : कोविड-19 लसी संघटित गुन्ह्यांचे लक्ष्य बनू शकतात, इंटरपोलचा अलर्ट