न्युयार्क - सौर ऊर्जेबाबत भारतातील काम आणि उद्योगांमध्ये होत असलेल्या बदलांचे संयुक्त राष्ट्राने कौतुक केले आहे. जग आपले लक्ष्य वेळेवर साध्य करेल, हे अपेक्षित आहे, असे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रात 'जनता आणि हवामान' या विषयावर वेबसंवादआयोजीत करण्यात आला होता. पर्यायवरणाबाबत जगभरात होत असलेल्या प्रयत्न उत्साहवर्धक असल्याचं संयुक्त राष्ट्राच्या उप-महासचिव अमीना मुहम्मद यांनी म्हटलं.
पर्यावरणाविषयी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. 110 देशांसह हवामानातील कार्बन कमी करण्यासाठी जपान आणि कोरिया चांगले काम करत आहेत. 2050 पर्यंत आपण आपले लक्ष्य गाठू, असे या दोन्ही देशांचे म्हणणे आहे. युरोपियन संघ 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जनात 55 टक्क्यांनी घट करण्याचे काम करीत आहे. त्यानी सौरऊर्जेवरही वेगाने काम केले पाहिजे, असे अमीना मुहम्मद म्हणाल्या.