महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

बगदादमध्ये दुहेरी आत्मघाती हल्ला; संयुक्त राष्ट्रसंघाकडून निषेध - संयुक्त राष्ट्रसंघाची बगदादमधील हल्ल्यावर प्रतिक्रिया

संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बगदादमधील आत्मघाती हल्ल्याचा निषेध नोंदवला. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

अँटोनियो गुटेरेस
अँटोनियो गुटेरेस

By

Published : Jan 22, 2021, 1:56 PM IST

न्युयार्क - ईराकची राजधानी बगदादमध्ये दुहेरी आत्मघाती हल्ला झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी या हल्ल्याचा निषेध केला. याबाबत त्यांच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली.

गुटेरेस यांनी पीडित व्यक्तींच्या कुटुंबियांबद्दल आणि इराकमधील सरकार आणि लोकांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केली. जखमींची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या, असे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी एका निवेदनात म्हटलं.

इराकच्या लोकांनी शांतता, स्थिरता आणि ऐक्य बिघडविण्याच्या उद्देशाने भीती व हिंसा पसरविण्याच्या कोणत्याही कृतींना नकार द्यावा, असे आवाहन केले. या भयंकर गुन्ह्यांमागील लोकांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी आणि न्याय मिळावा, असे आवाहन इराकी सरकारला आवाहन केले.

बगदादमध्ये प्राणघातक आत्मघाती हल्ला -

बगदादमध्ये दोन आत्मघाती बॉम्बस्फोटांमध्ये कमीतकमी 32 लोक ठार आणि 110 जण जखमी झाले होते. बगदादच्या टायेरान स्क्वेअरमधील कपड्यांच्या बाजारात हा हल्ला झाला. पहिला आत्मघाती हल्ला झाल्यानंतर मृतदेह व जखमींच्या शेजारी लोक जमली असतानाच दुसरा स्फोट घडवून आणला. ही माहिती इराकच्या गृहमंत्रालयाने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details