न्यूयॉर्क - कोरोना विषाणू जगभरातील १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. हा जागतिक साथीचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी सरकारी पातळीवरून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोना विषाणूमुळे संयुक्त राष्ट्रसंघानेही आपल्या कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' म्हणजेच घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. 12 एप्रिलपर्यंत आता संयुक्त राष्ट्रसंघाचे कामकाज मुख्यतहा: व्हिडिओ कॉल, ईमेल आणि फोनवरून चालणार आहे.
शुक्रवारी संयुक्त राष्ट्र कार्यालयात काम करत असेलल्या एका राजनैतिक अधिकाऱ्याला कोरना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावधानता बाळगण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये ४२१ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर एकट्या न्युयॉर्क शहरात १५४ जण कोरोना बाधित आहेत.