महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

Zhelensky Speech In US Congress : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कींना युएस काँग्रेसमध्ये 'स्टॅंडींग ओवेशन' - झेलेन्स्की स्टॅंडींग ओवेशन

रशिया-युक्रेन युद्धाच्या ( Russia-Ukraine War ) पार्श्वभूमीवर आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukraine President Volodymyr Zelensky address to US Congress ) यांनी युएस काँग्रेसला संबोधित केले. झेलेन्स्कीयांचे भाषण झाल्यानंतर युएस काँग्रेसमध्ये स्टॅंडींग ओवेशन ( Zelensky Received Standing Ovation In US Congress ) देण्यात आले.

Russia Ukraine War
Russia Ukraine War

By

Published : Mar 16, 2022, 8:08 PM IST

हैदराबाद -रशिया-युक्रेन युद्धाच्या ( Russia-Ukraine War ) पार्श्वभूमीवर आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की ( Ukraine President Volodymyr Zelensky address to US Congress ) यांनी युएस काँग्रेसला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी आतापर्यंत अमेरिकेने युक्रेनला केलेल्या मदतीसाठी आभारी असल्याचे म्हटले. झेलेन्स्कीयांचे भाषण झाल्यानंतर युएस काँग्रेसमध्ये स्टॅंडींग ओवेशन देण्यात आले.

काय म्हणाले झेलेन्स्की? -

अमेरिकेने आतापर्यंत केलेल्या मदतीसाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. रशियाने केलेला हल्ला हा केवळ आमच्यावर, आमच्या भुमीवर किंवा आमच्या शहरावर केलेला हल्ला नाही. रशियाचा हल्ला हा आमच्या मुल्ल्यांवर केलेला हल्ला आहे. हा हल्ला म्हणजे स्वत:च्या देशात मुक्तपणे जगण्याच्या आमच्या हक्क तसेच आमच्या स्वप्नावर केलेले आक्रमण आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.

हेही वाचा -MLA Fund Increased In Maharashtra: आमदारांसाठी अजित पवारांची मोठी घोषणा.. आमदार निधीत घसघशीत वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details