महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

अमेरिकन नौदलाच्या विमानाला अपघात, 2 वैमानिक ठार - अमेरिका विमान अपघात लेटेस्ट न्यूज

'अमेरिकन नौदलाचे टी -6 बी टेक्सन 2 विमान आज सायंकाळी पाचच्या सुमारास फोले, अलाबामा येथे कोसळले. या अपघातातून एअरक्रूज वाचू शकले नाहीत,' असे या बातमीत म्हटले आहे.

अमेरिकन नौदलाच्या विमानाला अपघात
अमेरिकन नौदलाच्या विमानाला अपघात

By

Published : Oct 25, 2020, 3:15 PM IST

वॉशिंग्टन -अमेरिकेच्या अलबामा राज्यात अमेरिकन नौदलाचे एक विमान कोसळले. या अपघातात दोन पायलट ठार झाले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या नौदल टी - 6 बी टेक्सन 2 प्रशिक्षक विमानाचा शुक्रवारी संध्याकाळी फोले सिटीजवळ अपघात घडला. अशी बातमी अलबामास्थित डब्ल्यूकेआरजी-टीव्हीने दिली आहे.

हेही वाचा -अमेरिकेची कोविड -19वरील उपचारांसाठी अ‌ँटिव्हायरल रेमडेसिव्हिर औषधास पूर्ण मंजूरी

'अमेरिकन नौदलाचे टी -6 बी टेक्सन 2 विमान आज सायंकाळी पाचच्या सुमारास फोले, अलाबामा येथे कोसळले. या अपघातातून एअरक्रूज वाचू शकले नाहीत,' असे या बातमीत म्हटले आहे.

'या दुर्घटनेमुळे कोणताही नागरिक जखमी झाला नाही याची आम्ही खात्री केली आहे. नौदल कर्मचारी घटनास्थळी आहेत आणि परिसराची सुरक्षा आणि स्थानिक समुदायाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना सहकार्य करीत आहेत,' असे या बातमीत पुढे म्हटले आहे. तसेच, मृतांची ओळख अद्याप सार्वजनिक केली गेलेली नाही.

हेही वाचा -'सत्तेत आल्यास सर्वांना कोरोना लस मोफत देणार'

ABOUT THE AUTHOR

...view details