महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प यांचा कोविड-१९ ने मृत्यू होण्याची इच्छा असणारे ट्विट हटवले जाणार.. नेटिझन्सना ट्विटरचा इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरूवातीपासून कोरोना महामारीविरुद्धच्या धोरणावरून टीकेचे केंद्रबिंदू राहिले आहेत. शुक्रवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्संनी ट्रम्प यांनी कोरोनाला गांभार्यांने न घेतल्याबद्दल आपला संताप व्यक्त केला आहे.

Twitter to remove tweets
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Oct 3, 2020, 8:33 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - शुक्रवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्विटरने एक मोठा खुलासा केला आहे. ट्विटरने म्हटले आहे, की डोनाल्ड ट्रम्प यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करने त्यांच्या नितीच्या विरुद्ध आहे. यामुळे अशा युजर्सचे खाते निलंबित केले जाऊ शकते.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरूवातीपासून कोरोनाविरुद्ध केलेल्या उपाययोजना व धोरणांवरून टिकेचे केंद्रबिंदू राहिले आहेत. शुक्रवारी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नेटिझन्सनी सोशल मीडियावर आपल्या रागाला मोकळी वाट करून दिली. त्यांच्या तब्येतीवरून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काही लोकांनी त्यांची प्रकृती बिघडण्याची तर काहींनी त्यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त केली.

हे प्रकरण समोर आल्यानंतर ट्विटरने म्हटले आहे, की ट्रम्प यांच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणाऱ्या लोकांचे ट्वीट हटवले जातील. ट्विटरने म्हटले आहे, की अशा प्रकारचे ट्वीट ट्विटरच्या नितीनियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे असे खाते निलंबित केले जाऊ शकते.

ट्रम्प वॉशिग्टंनच्या लष्करी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुढच्या महिन्यात ३ नोव्हेंबर ला होणाऱ्या अध्यक्षीय निव़डणुकीपूर्वी ट्रम्प आजारी पडल्याने हा बहुमोल वेळ त्यांच्या हातून निसटला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details