ट्विटरवरून आता नाही करता येणार राजकीय जाहीराती.. - ट्विटर राजकीय जाहीरात निर्णय
एखादा राजकीय संदेश हा अधिकाधिक लोकांपर्यंत तेव्हा पोहोचतो, जेव्हा लोक स्वतः एखादे अकाउंट फॉलो करतात, किंवा एखादे ट्विट रिट्विट करतात. पैसे देऊन एखाद्या ट्विटची पोहोच वाढवणे, हे चुकीचे आहे. त्याद्वारे लोकांच्या इच्छेविरूद्ध त्यांना तो ठराविक राजकीय संदेश पहावा लागतो. त्यामुळे अर्थातच व्यक्तीच्या राजकीय निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, जे आम्हाला नको आहे. एखादा राजकीय निर्णय हा त्या व्यक्तीने स्वतः घेतलेला असावा. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जॅक यांनी स्पष्ट केले.
सॅन फ्रान्सिस्को- ट्विटरवर आता कोणत्याही प्रकारची राजकीय जाहिरात करता येणार नाही, असे ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे यांनी जाहीर केले आहे. एखादा राजकीय संदेश हा अधिकाधिक लोकांपर्यंत तेव्हा पोहोचतो, जेव्हा लोक स्वतः एखादे अकाउंट फॉलो करतात, किंवा एखादे ट्विट रिट्विट करतात. पैसे देऊन एखाद्या ट्विटची पोहोच वाढवणे, हे चुकीचे आहे. त्याद्वारे लोकांच्या इच्छेविरूद्ध त्यांना तो ठराविक राजकीय संदेश पहावा लागतो. त्यामुळे अर्थातच व्यक्तीच्या राजकीय निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, जे आम्हाला नको आहे. एखादा राजकीय निर्णय हा त्या व्यक्तीने स्वतः घेतलेला असावा. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे जॅक यांनी स्पष्ट केले.