हैदराबाद : २५ मे रोजी फ्लाॅईड यांना मिनेसोटाच्या मिनिआपोलीसमध्ये एका दुकानाबाहेर अटक केली होती. तिथे डेरेक शाॅविन या पोलीस अधिकाऱ्याने अक्षरश: नऊ मिनिटे फ्लाॅईड यांच्या मानेवर आपला गुडघा दाबून धरला होता. फ्लाॅईड सारखे म्हणत होते की, मी श्वास घेऊ शकत नाही. नंतर रुग्णालयात नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर अमेरिकन राज्यात कोविड १९ची महामारी असतानाही आफ्रिकन अमेरिकन आणि कृष्णवर्णीय समाज यांच्या न्याय-हक्कांसाठी तीव्र लढा सुरू झाला. मंगळवारी फ्लाॅईड यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मृत्यूनंतर त्यांचा सन्मान करण्यात आला, त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी अमेरिकेत शतकानुशतके कृष्णवर्णीय समाजाने केलेल्या संघर्षाची आठवण करून दिली. या अंत्यविधीच्या वेळी अमेरिकेतले गुलामीचे युग आणि नागरी हक्क चळवळ याचेही स्मरण अनेकांना झाले.
निक्सनच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रम्पही वापरू शकतात 'कायदा-सुव्यवस्था' कार्ड! गेल्या काही वर्षात तामीर राईस, मायकेल ब्राऊन आणि एरीक गार्नर यांचेही अशाच पद्धतीने मृत्यू झाले होते. तेव्हापासून #BlackLivesMatter कृष्णवर्णीय लोकांवरच्या अन्यायाविरोधात आवाज उठवला जाऊ लागला. आता न्यूयॉर्कमध्ये निर्बंध उठवले गेलेत आणि त्यामुळे कोविडने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण वाढले. त्यात आता या आंदोलनांच्या गर्दीमुळे या विषाणूचा प्रसार होण्याची भीती जास्त आहे. आणि आता झालेली बेरोजगारीत वाढ आणि आर्थिक उतरण ही १९३०मधल्या महामंदीनंतरची सर्वात वाईट परिस्थिती आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखिका सीमा सिरोही या गेली दोन दशके अमेरिकेत राहतात. त्यांना यावेळचे हे आंदोलन वेगळे आणि विशेष महत्त्वाचे वाटते. त्या म्हणतात, भूतकाळात कृष्णवर्णीय समाजाने काळ्या लोकांच्या मृत्यूला पोलिसांना जबाबदार धरले. पण कदाचित त्यावेळी त्यांच्याकडे स्पष्ट पुरावे नव्हते. पण आता जाॅर्ज फ्लाॅईडचे व्हिडिओ फुटेज हे स्पष्ट आणि वेदनादायी आहे.ते पाहताना राग अनावर होतो. "आतापर्यंत हे शांततेने आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ ११व्या आणि १२व्या दिवशीही हे आंदोलन सुरू आहे. दिवसागणिक ते अमेरिकेतल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये होते आहे. लोक बदलाची मागणी करत नाहीयत. ते पोलिसाला शिक्षा करायची मागणी करत आहेत. दुसरी म्हणजे पोलिसांचा निधी बंद कारण्याची मागणी आहे. डेमोक्रेट्सनी अमेरिकेच्या संसदेत या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी एका कायद्याचा प्रस्ताव मांडला आहे. खरे तर आंदोलन टिकले आहे याचा अर्थ लोक यावेळी घरी परत जाणार नाहीत."
"हे सर्व या साथीच्या रोगादरम्यानच घडत आहे. प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे. ४० दशलक्ष अमेरिकन्सच्या नोकऱ्या गेल्या आहेत. समाजात काय चालले आहे, याचा विचार करण्यास लोकांना भाग पडत आहे. आणि व्हिडिओ इतका स्पष्ट आहे की लोक संभ्रमात राहूच शकणार नाहीत." वॉशिंग्टन डी.सी. वरून ज्येष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांच्याशी बोलताना सिरोही सांगत होत्या.
आंदोलकांची महत्त्वाची मागणी म्हणजे पोलीस सुधारणा सुनिश्चित करणे. त्यासाठी डेमोक्रेटिक पक्षाचे म्हणणे असे की पोलीस हिंसाचार आणि वांशिक अन्याय दूर करणारे कायदे आणले पाहिजेत. यात वंशद्वेषामुळे पोलिसाला संशयिताला मारण्यावर बंदी आणावी असे आहे. शिवाय पोलिसांना मिळणारा निधी बंद करावा अशीही मागणी जोर धरत आहे. पण त्याला ट्रम्प यांनी विरोध दर्शवला आहे.
निक्सनच्या पावलावर पाऊल ठेवत ट्रम्पही वापरू शकतात 'कायदा-सुव्यवस्था' कार्ड! हे आंदोलन ५० राज्यांमध्ये गावागावात पोचले आहे. सगळ्या वंशाचे आंदोलक यात उतरले आहेत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या वादग्रस्त विधानांबद्दल आणि परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली त्याबद्दल टीकेला सामोरे जावे लागत आहे. जेम्स मॅटिस आणि लष्कर पोलीस प्रमुख, माजी संरक्षण सचिव यांनी ट्रम्प यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शिवाय आंदोलन हाताळण्यासाठी केलेला लष्कराचा वापर यावरही टीका केली आहे. काही तुरळक गुन्हेगारी, लूटमार, चोऱ्या वगळता हे आंदोलन शांततेने सुरू आहे. सीमा सिरोही यांना विश्वास आहे की, येणाऱ्या नोव्हेंबरमधल्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ट्रम्प परिस्थिती वळवू शकतील. ट्रम्प यांनी माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्याच पावलावर पाऊल ठेवले आहे. त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कार्ड वापरले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ही परिस्थिती अशा प्रकारे हाताळली आहे की, जी त्यांच्या फायद्याची ठरू शकते. ते आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या मागे ठाम उभे राहणारे राष्ट्राध्यक्ष आहेत. १९६८मध्ये रिचर्ड निक्सन यांनीही हेच केले. रिचर्ड निक्सन जिंकले कारण अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांसह अनेकांना पोलिसांचा निधी थांबवू नये, असेच वाटत होते. त्यांना पोलीस हवे होते, तेही चांगल्या प्रकारे काम करणारे. पोलीस नसून कसे चालेल? गुन्हेगार एकमेकांचा खून करत आहेत, चोरी, घरफोडी होत आहे. तेव्हा पोलिसांची गरज आहेच. त्यामुळे टोकाच्या डाव्यांची ही मागणी हास्यास्पद आहे. गरज आहे ती पोलिसांमध्ये सुधारणा करण्याची.’ सिरोही म्हणाल्या.
आज अमेरिका, युके ते फ्रान्स असे जगभरातल्या आंदोलकांनी भूतकाळातला वंशभेद, गुलामगिरी यावर प्रकाशझोत टाकला आहे. रविवारी युकेतल्या ब्रिस्टल हार्बर इथला १७ व्या शतकातल्या गुलामांचा व्यापार करणाऱ्या एडवर्ड कोलस्टोनचा पुतळा वंशभेद आंदोलकांनी काढून टाकला. अमेरिकेतल्या इंडो-अमेरिकन राजकीय गटाच्या भूमिकेबद्दल अनेक भारतीयांनी शंका घेतली. प्रियांका चोप्रासारख्या सेलिब्रिटींनी #BlackLivesMatter कृष्णवर्णीयांवर होणाऱ्या अन्यायाबद्दल आवाज उठवला आहे. यामागचे कारण म्हणजे, सीएएविरोधात झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांची अमानुषता, कँपसमध्ये विद्यार्थी आणि अल्पसंख्यांकांना केलेले लक्ष्य याबद्दल प्रियांका गप्प बसली होती. तेव्हा उदारमतवादी भारतीयांनी तिच्यावर टीका केली होती. म्हणून आता प्रियांकाने तोंड उघडले आहे. सीमा सिरोही म्हणतात.
"प्रियांका चोप्राने सध्या कृष्णवर्णीयांच्या चळवळीबद्दल तोंड उघडले आहे. पण भारतातल्या आंदोलनाबद्दल तिने मौनच बाळगले होते. ती भाजप सरकारच्या बाजूची आहे. तिथे एक हिशेब होईल. भारतीय अमेरिकन्सची तरुण पिढी ही खूप प्रश्न विचारणारी, लोकशाहीवादी आणि डाव्या विचारसरणीची आहे. ते स्वत:हून पुढे येतील तेव्हा भारताच्या सरकारवर नक्कीच दबाव पडेल. डेमोक्रेट जिंकले तर मग वेगळे चित्र दिसेल." भारतातल्या धर्मावर आधारित भेदाच्या विरोधातल्या आंदोलनाबद्दल इंडो-अमेरिकन समाजाला काय वाटते, यावर सीमा सिरोही यांनी हे भाष्य केले.