महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ट्रम्प उवाच, म्हणे श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांत '१३८ million' लोक मारले गेले - 138 million

एका ट्विटर युजरने ट्रम्प यांना 'श्रीलंकेची लोकसंख्या २०१७ मध्ये २१.४४ मिलियन (दशलक्ष) होती,' याची वस्तुस्थितीची आठवण करून दिली. तर, दुसऱ्या एका युजरने 'श्रीलंकेतील घटना दुःखद आहे. मात्र १३८ दशलक्ष लोक मृत्यू पावलेले नाहीत. कारण तेथे विनाशकारी अणुबॉम्बचा स्फोट झालेला नाही,' अशी कोपरखळी मारली.

डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Apr 22, 2019, 10:40 AM IST

वॉशिंग्टन - श्रीलंकेत कोलंबोतील चर्चमध्ये ईस्टर संडेदिवशी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. या स्फोटांमध्ये मृतांचा आकडा आता २९० वर पोहोचला आहे. याविषयी शोक प्रदर्शित करताना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये घोडचूक केली. त्यांनी ''१३८ million' लोक मारले गेले' असे म्हटले. प्रत्यक्षात श्रीलंकेची लोकसंख्याही १३८ मिलियन (दशलक्ष) इतकी नाही. त्यामुळे ट्रम्प यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. नंतर हे ट्विट काढून घेण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प


विक्षिप्त ट्विटस आणि वक्तव्यांमुळे ट्रम्प नेहमी चर्चेत असतात. आता कोलंबोतील बॉम्बस्फोटांमध्ये २९० लोक मृत आणि ५०० जखमी झाल्याने अत्यंत गंभीर आणि दुःखद वातावरण आहे. थोडीफार आकड्यांमध्ये तफावत होणे शक्य आहे. मात्र, या स्थितीत अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षाने अशा प्रकारची उथळपणा दाखवून देणारी चूक अक्षम्य ठरते. यामुळे ट्रम्प यांना टीकेचा सामना करावा लागला. तसेच, सोशल मीडियावर त्यांची चांगलीच खिल्ली उडवण्यात आली.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प


एका ट्विटर युजरने ट्रम्प यांना 'श्रीलंकेची लोकसंख्या २०१७ मध्ये २१.४४ मिलियन (दशलक्ष) होती,' याची वस्तुस्थितीची आठवण करून दिली. तर, दुसऱ्या एका युजरने 'श्रीलंकेतील घटना दुःखद आहे. मात्र १३८ दशलक्ष लोक मृत्यू पावलेले नाहीत. कारण तेथे विनाशकारी अणुबॉम्बचा स्फोट झालेला नाही,' अशी कोपरखळी मारली. यानंतर ट्रम्प यांचे मूळ ट्विट काढून घेण्यात आले. तसेच, नव्याने सुधारित ट्विटही करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details