महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ट्रम्प यांची निवडणुकीसाठी ओहियो, विस्कॉन्सिन आणि फ्लोरिडामध्ये विशेष प्रचार मोहिम - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ओहियो, विस्कॉन्सिन आणि फ्लोरिडा या तीन राज्यात विशेष प्रचार मोहिम राबवत असल्याचे पहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीत फ्लोरिडामधून ट्रम्प यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात निर्णायक आघाडी मिळाली होती.

Trump to vote in person
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Oct 24, 2020, 6:35 PM IST

वॉशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ओहियो, विस्कॉन्सिन आणि फ्लोरिडा या तीन राज्यात विशेष प्रचार मोहीम राबवत असल्याचे पहायला मिळत आहे. मागच्या निवडणुकीत फ्लोरिडामधून ट्रम्प यांना त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या विरोधात निर्णायक आघाडी मिळाली होती. त्यामुळे यावेळी देखील ट्रम्प यांनी फ्लोरिडासोबतच ओहियो आणि विस्कॉन्सिन या दोन राज्यांना आपल्या प्रचाराचे प्रमुख केंद्र बनवले आहे.

दरम्यान भारतातून अमेरिकेत स्थायिक झालेल्या नागरिकांच्या मते डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असलेले जो बायडेन हे डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा अधिक समजदार आहेत. असं एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच अमेरिकेतील 45 टक्के लोकांची राष्ट्राध्यपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना पसंती आहे. तर बायडेन यांना 49 टक्के लोकांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी पसंती दिली आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात जो. बायडेन हे बाजी मारताना दिसत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details