महाराष्ट्र

maharashtra

प्रिन्स हॅरी आणि मेघन यांच्या सुरक्षेसाठी अमेरिका पैसे देणार नाही - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप

ड्यूक ऑफ ससेक्स आणि डचेस ऑफ ससेक्स प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेघन मार्केल हे आंतरराष्ट्रीय कराराच्या अंतर्गत सुरक्षा उपायांना पुष्टी देणारे आंतरराष्ट्रीय संरक्षित लोक मानले गेले आहेत. मात्र, त्यांच्या पदावरून मुक्त झाल्यानंतर स्थिती बदलल्यामुळे त्यांना देण्यात येणारी सुरक्षा ही येत्या आठवड्यात बंद होईल, असे कॅनडाच्या सार्वजनीक सुरक्षा मंत्री आणि प्रवक्त्या मेरी-लीझ पॉवर म्हणाल्या आहेत.

By

Published : Mar 30, 2020, 2:18 PM IST

Published : Mar 30, 2020, 2:18 PM IST

Updated : Mar 30, 2020, 2:37 PM IST

प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेघन मार्केल
प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेघन मार्केल

लंडन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन यांच्या भविष्याबद्दल आपले मत मांडले आहे. प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन हे अमेरिकेत राहत असल्यास या जोडप्याच्या सुरक्षेसाठी अमेरिकन सरकार पैसे देणार नाही असा आग्रह त्यांनी धरला आहे.

माध्यमांना उत्तर देताना ट्रंप यांनी रविवारी ट्विट केले. ते म्हणाले, “मी राणी आणि युनायटेड किंग्डमचा एक चांगला मित्र आणि प्रशंसक आहे. राज्य सोडलेले हॅरी आणि मेघन कॅनडामध्ये कायमचे वास्तव्यास असल्याची माहिती आहे. आता त्यांनी अमेरिकेसाठी कॅनडा सोडला आहे. मात्र, अमेरिका त्यांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी पैसे देणार नाही, त्यांना पैसे द्यावे लागतील!"

प्रिंस हॅरी हे राणी एलिझाबेथ द्वितिय यांचा नातू असून सिंहासनाचा सहावा हकदार आहे. त्यांचा मे २०१८ मध्ये अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्केलशी विन्डसर कॅसल येथे विवाह केला होता. या राजेशाही विवाहसोहळ्याचे चित्रण जगभरातील विविध माध्यमांवरुन करण्यात आले होते. जगभरातील कोट्यावधी नागरिकांनी हा विवाहसोहळा पाहिला होता. परंतु, नंतर या दाम्पत्याने ब्रिटिश माध्यमांनी त्यांची केलेली चौकशी ही असहनीय आणि त्रासदायक असल्याचे म्हटले.

गेल्या वर्षापासून प्रिन्स हॅरी हे पत्नी मेघनबरोबर कॅनडाच्या व्हँकुव्हर बेटावर वास्तव्यास होते. जानेवारीत त्यांनी त्यांच्या राजशाहीच्या वरिष्ठ सदस्यपदाचा राजीनामा देऊन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन उत्तर अमेरिकेत वसण्याच्या योजनेबाबत घोषणा केली होती आणि मार्च महिन्याच्या शेवटी हे दाम्पत्य अधिकृतपणे विभाजित होणार होते. मार्चच्या शेवटी हे विभाजन अधिकृत होणार असल्याची माहिती होती. तर, शाही सेवेतून मुक्त झाल्यानंतर कॅनडा सरकार त्यांना सुरक्षा प्रदान करण्यात येणार नाही, असे सांगितले होते.

कॅनडाच्या सार्वजनीक सुरक्षा मंत्री आणि प्रवक्त्या मेरी-लीझ पॉवर म्हणाल्या, प्रिन्स हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स तर, मेघन मार्केल या डचेस ऑफ ससेक्स असल्याने आंतरराष्ट्रीय कराराखाली सुरक्षा उपायांना पुष्टी देणारे "आंतरराष्ट्रीय संरक्षित व्यक्ती" मानले गेले आहेत. मात्र, शाही पदभारातून मुक्त झाल्यानंतर या दाम्पत्याची सुरक्षा व्यवस्था थांबवण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. माहितीनुसार, हे जोडपे आणि त्यांचा दहा महिन्यांचा मुलगा आर्ची अलीकडेच लॉस एंजेलिसला गेले. मेघनचा जन्म लॉस एंजेलिसमध्ये झाला असून तिची आई डोरिया रागलँड अजूनही त्या भागात राहत आहे.

Last Updated : Mar 30, 2020, 2:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details