वॉशिग्टन - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून पुरवल्या जाणारा निधी रोखण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानंतर ट्रम्प यांनी मोठे विधान केले आहे. आपण आजपासून जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे आपले सर्व संबंध कायमस्वरुपी संपवत आहोत, असे म्हटले आहे.
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे संबंध कायमचे तोडले - .S. 'terminating' relationship with WHO
आजपासून जागतिक आरोग्य संघटनेबरोबरचे आपले सर्व संबंध कायमस्वरूपी संपवत आहोत, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
वर्षाला ४० मिलियन डॉलर इतकी कमी रक्कम देवूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचे नियंणत्र आहे. जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिका वर्षाला ४५० मिलियन डॉलर्स देत आहे. तरिही जागतिक आरोग्य संघटना चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीनची रक्कम ही अमेरिकेपेक्षा खुपच कमी आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यात डब्ल्यूएचओ सुरुवातीच्या टप्प्यातच अपयशी ठरला, मात्र, आता सुधारणेची गरज आहे. त्यामुळे आजपासून आम्ही आरोग्य संघटने बरोबरचे आपले संबंध कायमचे संपवत आहोत, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी कोरोनाच्या उद्रेकात डब्ल्यूएचओ आपले कर्तव्य बजाविण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जेव्हा हा विषाणू चीनमध्ये पसरला, तेव्हा संयुक्त राष्ट्र संघटनेने ते लपविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ट्रम्प यांनी केला होता. तसेच कोरोना विषाणूचा जगभरात प्रसार होत असताना जागतिक आरोग्य संघटनेने चीनला अनुकूल अशी भूमिका घेतल्याचेही ते म्हणाले होते.