वॉशिंग्टन डी.सी - अमेरिका राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातच ट्रम्प यांनी एक व्हिडीओ जारी केला. 'आता मला आधीपेक्षा बरे वाटत आहे. येथील डॉक्टर, नर्सेस मेहनत घेत आहेत. अमेरिकेसाठी जे अभियान मी सुरू केले आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी तत्पर आहे. येते काही दिवस खरी परीक्षा पाहणारे असतील, असे ट्रम्प यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच, यावेळी त्यांनी डॉक्टर, नर्सेस आणि नागरिकांचे आभार मानले.
अमेरिका जगातील सर्वात महान आणि शक्तिशाली देश आहे. अमेरिकेला आणखी चांगले बनवायचे आहे. या संकटात मला एका ठिकाणी बसून चालणार नाही. एक नेता म्हणून मी सर्व समस्यांचा सामना करायलाच हवा, असे अध्यक्ष म्हणाले.