वॉशिंग्टन -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जम्मू आणि काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना फटकारले आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढलेला तणाव कमी करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करा, असे ट्रम्प यांनी इम्रान यांना सांगितले आहे. खुद्द व्हाईट हाऊसनेच यासंदर्भात शनिवारी माहिती दिली.
न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा पारिषदेच्या (यूएनएससी) होणाऱ्या बैठकीपूर्वी शुक्रवारी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता.