वॉशिंग्टन :अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोमवारी (स्थानिक वेळेनुसार) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर व्हाईट हाऊसला परतताच त्यांनी आपला मास्क काढत उपस्थितांना अभिवादन केले. ट्रम्प यांची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर त्यांच्यावर वॉल्टर रीड नॅशनल मिलिट्री मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू होते.
व्हाईट हाऊसचे डॉक्टर सेन कॉनले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्र्म्प हे अजूनही पूर्णपणे बरे झाले नाहीत. मात्र, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत, ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाताच, मास्क काढत ब्लू रुम बाल्कनीवरुन उपस्थितांना अभिवादन केले. सीएनएन वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली.