महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

मागील २ वर्षांतील मोठ्या दबावानंतर हाफिजला पकडण्यात यश - ट्रम्प - hafiz saeed

तब्बल १० वर्षांच्या शोधानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या 'कथित सूत्रधारा'ला पाकिस्तानात अटक करण्यात आली. मागील २ वर्षांत तर त्याचा कसून शोध करण्यावर जोर देण्यात आला होता,' असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

ट्रम्प

By

Published : Jul 18, 2019, 8:37 AM IST

Updated : Jul 18, 2019, 9:33 AM IST

वॉशिंग्टन - मुंबईवरील दशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार हाफिज सईद याला पाकिस्तानात अटक झाली. यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. जमात-उद-दवाहचा म्होरक्या हाफिज याला पकडण्यासाठी मागील २ वर्षे मोठा दबाव आणला होता, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हफीजला पकडण्यात आपल्या दबावाचा वाटा मोठा असल्याचे सांगत या कारवाईचे श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतले आहे.

हाफिज याला संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. तसेच, अमेरिकेने त्याच्या डोक्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस लावले होते. त्याला दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याच्या आरोपावरून पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान यांची वॉशिंग्टन येथे ट्रम्प यांच्याशी भेट होणार आहे. त्याच्या काही दिवस आधीच हफीजला अटक करण्यात आली आहे.

तब्बल १० वर्षांच्या शोधानंतर मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांच्या 'कथित सूत्रधारा'ला पाकिस्तानात अटक करण्यात आली. मागील २ वर्षांतील मोठ्या दबावानंतर त्याचा कसून शोध करण्यावर जोर देण्यात आला होता,' असे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.

हाफिज हा लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. त्याच्यावर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आखणी केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात १६६ लोक मारले गेले होते.

भारताने हाफिजविरोधातील दहशतवादी खटल्यांची आणि त्याचा या कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या पुराव्यांची कागदपत्रे वारंवार सादर केली आहेत. या हल्ल्यात मुंबई ४ दिवस पोळून निघाली होती. यात हाफिजसह १० पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग होता. तो इतकी वर्षे पाकिस्तानात मोकाट फिरत असून भारतविरोधी रॅलीजना संबोधित करण्यापर्यंत निर्ढावलेला आहे.

सध्या आर्थिक कारवाईचा बडगा उचलत पाकिस्तानचा समावेश 'ग्रे लिस्ट'मध्ये झाला आहे. अवैध आर्थिक व्यवहार आणि दहशतवादाला अर्थपुरवठा करण्याच्या शक्यतेवरून त्यांच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. तसेच, दहशतवादाला अर्थपुरवठा करणे थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय पातळीवरून वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने हाफिजवर दहशतवादाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता. यात दहशतवादाला अर्थपुरवठा, अवैध आर्थिक व्यवहार या आरोपांचाही समावेश आहे.

२०१७ मध्ये हाफिज आणि त्याच्या ४ साथादारांना पाकिस्तानात ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानातील पंजाबातील न्यायिक आढावा मंडळाने त्यांची कैद वाढवण्यास नकार दिल्यानंतर ११ महिन्यांतच त्यांना सोडण्यात आले.

मुंबई दहशतवादी हल्ल्याला १० वर्षे पूर्ण होण्याआधी या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकेने पाकवर दबाव आणला होता. यासाठी ५ लाख डॉलर्सचे नवे पारितोषिक जाहीर करण्यात आले.

Last Updated : Jul 18, 2019, 9:33 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details