नवी दिल्ली - 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भारतासंबंधीची व्यापारविषयक धोरणे भारतासाठी फारशी हितकारक नाहीत', असे मत ज्येष्ठ पत्रकार अॅलन फ्रेडमन यांनी त्यांच्या 'डेमोक्रेसी इन पेरिलः डोनाल्ड ट्रम्प'स अमेरिका' या पुस्तकाद्वारे मांडले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष भारतासाठी 'दुधारी तलवार' ठरू शकतील असेही अॅलन यांनी म्हटले आहे.
फ्रेडमॅन यांच्या मते, चीनबरोबर ट्रम्प यांचे व्यापार युद्ध आणि अनेक आंतरराष्ट्रीय करारांमधून घेतलेली माघार हे त्यांच्या प्रचार मोहिमेतील आश्वासनांशी सुसंगत असे निर्णय आहेत. एकीकडे आंतरराष्ट्रीय राजकारणात 'शत्रूचा शत्रू मित्र' या धोरणातून ट्रम्प भारताच्या बाजूने झूकत असले तरी, ते एक तडकाफडकी, अनपेक्षित आणि आक्षेपार्ह निर्णय घेणारी व्यक्ती आहेत.