महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 16, 2020, 7:24 AM IST

ETV Bharat / international

डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीत येणार भारत दौऱ्यावर.. द्विपक्षीय व्यापाराला मिळणार प्रोत्साहन

ट्रम्प मायदेशी महाभियोगाला सामोरे जात असून फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ते भारताला भेट देण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २४ फेब्रुवारी ही संभाव्य तारीख असल्याची चर्चा होत आहे. ट्रम्प यांच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या ८ वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकालात २०१० आणि २०१५ असे दोन वेळा भारताला भेट दिली होती. मात्र, ट्रम्प यांचा पहिलाच भारत दौरा अजून व्हायचा आहे.

Trump might be visiting India in Feb 2020
फेब्रुवारीत ट्रम्प यांच्या भारतभेटीची शक्यता, दोन्ही बाजू व्यापाराला प्रोत्साहन देण्यास उत्सुक

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून शपथग्रहण केल्यानंतर तीन वर्षांनी, अखेरीस डोनाल्ड ट्रम्प आता भारताला भेट देण्याची शक्यता आहे. ट्रम्प मायदेशी महाभियोगाला सामोरे जात असून फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ते भारताला भेट देण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार २४ फेब्रुवारी ही संभाव्य तारीख असल्याची चर्चा होत आहे. ट्रम्प यांच्या अगोदरचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या ८ वर्षांच्या अध्यक्षीय कार्यकालात २०१० आणि २०१५ असे दोन वेळा भारताला भेट दिली होती. मात्र, ट्रम्प यांचा पहिलाच भारत दौरा अजून व्हायचा आहे.

२०१९ या वर्षाच्या प्रजासत्ताक दिन समारंभास ट्रम्प यांना भारताने प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण दिले होते, पण व्हाईट हाऊसने नंतर हे निमंत्रण अध्यक्षांच्या राष्ट्राला उद्देश्यून करावयाच्या भाषणाची तारीख एकच येत असल्याचे कारण सांगत नाकारले. गेल्या तीन वर्षात ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी बहुपक्षीय शिखर परिषदेच्या अनुषंगाने एकमेकांना भेटले असून त्यांची शेवटची भेट सप्टेंबर २०१९ मध्ये यूएनजीए शिखर परिषदेच्या वेळेस झाली होती. न्यूयॉर्क बैठकीच्या दोन दिवस अगोदर, ट्रम्प यांनी कोणत्याही विद्यमान अध्यक्षाने उचलले नाही, असे अभूतपूर्व पाऊल उचलत टेक्सासमधील मोदी यांच्या 'हाऊडी मोदी' या अमेरिकेतील भारतीयांच्या समारंभात सहभाग घेतला होता. गेल्या काही महिन्यात काश्मिरमध्ये घालण्यात आलेले संपर्कावरील निर्बंध आणि दीर्घकाळ राजकीय स्थानबद्धता यासाठी भारताला अमेरिकेतीलल संसद सदस्यांकडून विशेषतः विरोधी डेमोक्रेटिक पक्षाकडून प्रश्नांच्या फैरी आणि टिकेला सामोरे जावे लागले आहे.

आखाती प्रदेशात भारताचे खूप काही पणाला लागले असल्याने, इराणियन पेचप्रसंग आणि अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या सुरू असलेला तणाव हा भारतासाठी दरम्यान अत्यंत महत्वाचा काळजीचा असा मुद्दा आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की, ट्रम्प यांची भारतभेट जगाच्या नजरेत भरण्याच्या दृष्टीने आणि राजकीय रेट्यासाठी महत्वाची ठरणार आहे, पण भारत-अमेरिका संबंध हे दोन अधिक दोन प्रकारच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयांमध्ये संवादांच्या पातळीवरच्या संस्थात्मक यंत्रणांच्या माध्यमातून विकसित झाले आहेत, ही गोष्ट ते अधोरेखित करतात.

या भेटीच्या द्वारे दोन्ही बाजू किमान काही अंशतः व्यापारी कराराला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी घोषणा करतील. वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांनी वॉशिंग्टन डीसी येथील ब्रुकिंग्ज इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ फेलो तन्वी मदन आणि आघाडीचे डावपेचात्मक विचारवंत डॉ. सी. राजमोहन यांच्याशी ट्रम्प यांची भेट, भारत-अमेरिका व्यापारी असमानता आणि इराणियन पेचप्रसंग आणि भारतावर त्याचा प्रादेशिक परिणाम यावर चर्चा केली.

- स्मिता शर्मा (वरिष्ठ पत्रकार, नवी दिल्ली)

ABOUT THE AUTHOR

...view details