वॉशिंग्टन डी.सी -अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शनिवारी एका कार्यक्रमामध्ये बोलताना कोरोना विषाणूमध्ये अमेरिका अधिकाऱ्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीबद्दल टीका केली होती. त्यावर आज राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांवर पलटवार केला आहे. 'बराक ओबामा हे अत्यंत अयोग्य राष्ट्रपती होते', असे ट्रम्प यांनी म्हटलं. कॅम्प डेव्हीड जाण्यापूर्वी व्हाईट हाऊसमधील पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
'बराक ओबामा हे अयोग्य राष्ट्रपती' - war against coronavirus
आज राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ओबामांवर पलटवार केला आहे. 'बराक ओबामा हे अत्यंत अयोग्य राष्ट्रपती होते', असे ट्रम्प यांनी म्हटलं.
ओबामा यांनी शनिवारी महाविद्यालये व विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ट्रम्प यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. कोरोना संकटातील परिस्थिती हाताळण्याबाबत आणि कृष्णवर्णीय लोकांना होणाऱ्या त्रासावर त्यांनी भाष्य केले होते. कोरोना संसर्ग काळामध्ये हे पाहायला मिळाले, की अनेक जण प्रमुख असल्याचे ढोंगही करूही शकत नाहीत, असे बराक ओबामा म्हणाले होते.
जगभरामध्ये कोरोना विषाणूनने थैमान घातले असून कोरोनाच सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 89 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 14 लाखांहून अधिक जणांना संसर्ग झाला आहे.