महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'जो बिडेन यांनी ड्रग्ज चाचणी करावी'; ट्रम्प यांचे आव्हान - donald trump

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डिबेटच्या आधी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना ड्रग्जची चाचणी करण्याचे आव्हान दिले आहे. प्रेसिडेंशियल डिबेटआधी सुस्त असलेल्या बिडेन यांनी ड्रग्जची चाचणी करावी, असे ते म्हणाले.

जो बिडेन-ट्रम्प
जो बिडेन-ट्रम्प

By

Published : Sep 28, 2020, 7:05 PM IST

वॉशिंग्टन डी.सी - अमेरिकेमध्ये 3 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रचार मोहीम जोरदार सुरू केली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बिडेन यांच्या दरम्यान मंगळवारी प्रेसिडेंशियल डिबेट होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डिबेटच्या आधी डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बिडेन यांना ड्रग्जची चाचणी करण्याचे आव्हान दिले आहे.

प्रेसिडेंशियल डिबेटआधी सुस्त असलेल्या बिडेन यांनी ड्रग्जची चाचणी करावी, मीदेखील चाचणी करण्यास तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अध्यक्षीय वादविवादांच्या वेळी सर्व प्रकारच्या पारदर्शकता राखण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. चर्चेची तयारी पूर्ण झाली आहे. बायडेनची औषध चाचणी घेण्यात आली होती जेणेकरून प्रत्येकजण विसंगती शोधू शकेल, असेही ते म्हणाले.

अमेरिकी राज्यघटनेनुसार, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यकाळ केवळ 4 वर्षे आहे. हा कार्यकाळ 20 जानेवारी रोजी संपुष्टात येईल. नुकत्याच पार पडलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिका स्थित भारतीय यंदा रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या प्रमाणात मतदान करणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

ABOUT THE AUTHOR

...view details