वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेने येमेनमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत कासीम-अल-रिमी ठार झाल्याचे म्हटले आहे. कासीम हा अल-कायदा या अरबी द्वीपकल्पातील (The Arabian Peninsula (AQAP))दहशतवादी संघटनेच्या संस्थापक नेत्यांपैकी एक होता.
'अमेरिकेने येमेनमध्ये केलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत कासीम-अल-रिमी या दहशतवाद्याला ठार करण्यात आले. ओसामा बिन लादेननंतर अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख बनलेल्या अयमन-अल-जवाहिरी या दहशतवादी नेत्याच्या खालोखाल त्याची जागा होती. तो अल कायदाच्या संस्थापक नेत्यांपैकी एक होता,' असे निवेदन व्हाईट हाऊसमधून जारी करण्यात आले आहे.