वॉशिंग्टन डी. सी -जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. या विषाणूवर प्रतिबंधात्मक लस शोधण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक रात्रंदिवस संशोधन करत आहेत. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षअखेरीपर्यंत कोरोना विषाणूवर लस तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वीही त्यांनी याप्रकाराचे दावे केले होते.
'वर्षअखेरीपर्यंत कोरोना विषाणूवर लस तयार होईल', डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षअखेरीपर्यंत कोरोना विषाणूवर लस तयार होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वीही त्यांनी याप्रकाराचे दावे केले होते.
सध्या जगभरात कोरोनावर प्रतिबंधात्मक लस शोधण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप ठोस अशी लस कोणाच्याचं हाताला लागली नाही. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली लस क्लिनिकल ट्रायलमधून जात आहे. सप्टेंबरपर्यंत कोरोना विषाणूच्या विरोधातील लस बनविण्यात यश येईल, असा दावा ऑक्स्फर्ड विद्यापीठातील संशोधकांनीही केला आहे. लस विकसीत करणाऱ्या पथकाचे प्रमुख संशोधक प्रो. सारा गिलबर्ट यांनी सांगितले की, सीएचएडीओएक्सवन (ChAdOX1) तंत्रज्ञान वापरून ही लस कोरोनाविरोधात यशस्वीपणे वापरता येईल. त्यानुसार सप्टेंबरपर्यंत 10 लाख लसी उपलब्ध होतील.
दरम्यान भारतातही कोरोनावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. '40 विविध लसी बवनिण्याचे काम सुरू आहे. सध्याच्या घडीला जगभरात कमीत कमी साठ विविध सरकारे आणि तेथील कंपन्यांची या आजारावरील लस आणि औषधोपचार शोधून काढण्यासाठी अक्षरशः चढाओढ लागली आहे. यापैकी अमेरिका, चीन किंवा त्यांच्या कंपन्या प्रथम यशस्वी होतील, असा अंदाज आहे. तसेच या घडीला 60 पैकी कमीत कमी पाच जण या लसीच्या अगदी जवळ पोहोचले आहेत.