न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी तयार करण्यात आलेली वेबसाइट (संकेतस्थळ) हॅक करण्यात आली आहे. क्रिप्टोकरन्सीद्वारे सायबर हल्लोखारांनी नागरिकांना पैसेही मागितले. तसेच ट्रम्प यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवणारे मेसेज पोस्ट केले.
एफबीआयच्या नावाने खोटी नोटीस
वेबसाइट हॅक केल्यानंतर आरोपींनी एक नोटीस जारी केली. 'हे संकेतस्थळ ताब्यात घेण्यात आले आहेत', अशी खोटी नोटीस एफबीआयच्या नावाने पोस्ट केली. यातील इंग्रजी मोडक्यातोडक्या भाषेत होती. ट्रम्प सरकार कोरोना विषाणूच्या फैलावामागे आहे. तसेच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प परकीय शक्तींबरोबर मिळून फेरफार करत आहेत, असा संदेश संकेतस्थळावर टाकण्यात आला होता.
क्रिप्टोकरन्सीद्वारे मागितले पैसे
ट्रम्प यांच्या संकेस्थळावरील मजकूर चोरी केल्याचा किंवा त्यात फेरफार केल्याचा कोणताही पुरावा हॅकने मागे सोडला नाही, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. सायबर गुन्हेगारांनी संकेस्थळावर दोन क्रिप्टोकरन्सी खात्यांची नावे दिली होती. त्यात पैसे जमा करण्याचे आवाहन संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांना केले होते.
माहीत चोरी नाही
'ट्रम्प यांचे प्रचार संकेतस्थळ बंद आहे. संकेतस्थळावर कोठून हल्ला झाला याची माहिती मिळविण्यासाठी आम्ही सुरक्षा दलांबरोबर मिळून काम करत आहोत, असे ट्रम्प यांच्या प्रचार प्रमुख टीम मुर्ताघ यांनी ट्विटरवर म्हटले. संवेदनशील माहिती संकेतस्थळावर टाकली नसल्याने माहिती चोरी झाली नाही. संकेतस्थळ सुरू होईल, असेही अधिकृत जारी केले आहे.