फ्लोरिडा- अफगाणिस्तानात रशियाने तालिबानशी संबंधित अतिरेक्यांना अमेरिकन सैनिकांना ठार मारण्यासाठी पैसे दिल्याचे वृत आले होते. आता पुन्हा या बातम्यांनी जोर धरला आहे. याबाबत अफगाणिस्तानात सैनिकांच्या मृत्यूबद्दल कोणतीही वास्तविक माहिती आलेली नाही. या बातम्या म्हणजे लक्ष वेधण्यासाठीचे एक षड्यंत्र आहे, असे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे
तालिबानच्या मदतीने अमेरिकन सैन्याला मारण्याचे वृत्त, रशियाचा खोटेपणा'
अफगाणिस्तानात सैनिकांच्या मृत्यूबद्दल कोणतीही वास्तविक माहिती आलेली नाही. या बातम्या म्हणजे लक्ष वेधण्यासाठीचे एक षड्यंत्र आहे, असे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे
अफगाणिस्तानात अमेरिकन सैन्य मारण्यासाठी रशिया तालिबानी संघटनेला बक्षिसे देत असल्याच्या बातम्या येत आहेत. रशिया आणि चीनसोबत आतापर्यंतच्या अमेरिकेचे कोणत्याच अध्यक्षांनी कठोर भूमिका घेतली नाही. जितकी मी घेतो, असाही दावा त्यांनी केला. जर खरोखर अमेरिकन सैन्यावर हल्ले करण्यासाठी रशिया तालिबानला बक्षीस देत असेल, तर त्यावर कारवाई करण्यातच येईल, असे ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, अफगाणिस्तानात तैनात असलेल्या अमेरिकी लष्कारच्या जवानांना ठार मारल्याबद्दल रशियन सैन्याने तालिबानला बक्षिसे दिली होती, असे वृत अमेरिकेच्याच एका गुप्तचर अधिकाऱ्यांने उघड केले होते. याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर, सैनिकांना ठार मारण्यासाठी पैसे दिले नसून, ही एक अफवा असल्याचे रशियाने स्पष्ट केले होते.