वॉशिंग्टन डी.सी -अमेरिकेमध्ये 3 नोव्हेंबरला अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी प्रचार मोहीम जोरदार सुरू केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर पुन्हा एकादा निशाणा साधला आहे. जो बायडेन हे अमेरिका अध्यक्षपद निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवार आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे.
अमेरिका अध्यक्षपद निवडणुकीच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात वाईट उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात आहे. त्यामुळे माझ्यावर जास्त दबाव आहे. जर ते चांगले उमेदवार असते. तर माझ्यावर कमी दबाव असता. तुम्ही बायडेनसारख्या व्यक्तीपासून कसे पराभूत होऊ शकता, अशी टीका डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.