वॉशिंगटन - व्हाईट हाऊस येथे गोळीबार करण्यात आला. यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये कोरोनाबाबत पत्रकार परिषद सुरू होती. गोळीबार होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढले. याबाबत स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करून माहिती दिली.
ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार - व्हाईट हाऊस गोळीबार न्यूज
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये कोरोनाबाबत पत्रकार परिषद सुरू होती. गोळीबार होताच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रम्प यांना सुरक्षित बाहेर काढले. याबाबत स्वतः ट्रम्प यांनी ट्विट करून माहिती दिली.
ट्रम्प यांची पत्रकार परिषद सुरू असताना व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार
सुरक्षा कर्मचाऱ्यांनी लगेच कारवाई केल्यामुळे काही काळातच परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले. त्यासाठी त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांचे आभार देखील मानले. तसेच एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला व्हाईट हाऊसच्या सिक्रेट सर्विसकडून गोळी लागली असावी, असा अंदाज ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेवर परिणाम झाला असून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.