महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

'चीनवर शुल्क लादणे हा निश्चितच एक पर्याय' - चीन

कोरोना विषाणूसंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी चीनवर शुल्क लादणे हा निश्चित एक पर्याय आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

Tariff on China for mishandling virus outbreak is 'certainly an option': Trump
Tariff on China for mishandling virus outbreak is 'certainly an option': Trump

By

Published : May 2, 2020, 3:11 PM IST

वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूसंदर्भात दिशाभूल केल्याप्रकरणी चीनवर शुल्क लादणे हा निश्चित एक पर्याय आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी कोरोना विषाणूच्या फैलवासाठी शिक्षा म्हणून चीनवर शुल्क लादण्याचा संकेत दिला होता.

सध्याच्या परिस्थितीचे आम्ही निरक्षण करत असून काय होणार याकडेही आमचे लक्ष आहे. चीनच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत. नक्कीच त्याबद्दल आम्ही आंनदी नाही आहोत. कोरोना संकटामुळे जगातील 182 देश कठीण परिस्थितीमध्ये आहेत, असे एका प्रश्नाच्या उत्तरात ट्रम्प म्हणाले.

यापूर्वी राज्य सचिव माईक पोम्पीओ यांनी चीनवर कोरोनाविषाणूच्या मुद्द्यावर पारदर्शक नसल्याचा आरोप केला होता. 'विषाणू कोठून आला हे चीनला ठाऊक नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, चीनमध्ये विषाणूवर बोलणाऱ्या व्यक्तींना बोलू दिले नाही. चीनने सुरुवातीपासूनच विषाणूवर चर्चा करणे थांबवले होते', असे पोम्पीओ म्हणाले.

चीन कम्युनिस्ट पार्टी जगासाठी वुहानमधून हा विषाणू कसा तयार झाला आणि जगभर कसा पसरला, हे समजून घेण्याचा मार्ग मोकळा करेल, अशी मला आशा आहे. तसेच असे पुन्हा होणार नाही. यासाठी विषाणूचा उद्रेक कसा झाला, हे समजून घेणे खरोखर महत्वाचे आहे. ही संपूर्ण परिस्थिती कशी उद्भवील हे जाणून घेण्याच जगाला हक्क आहे, असे पोम्पीओ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details