वॉश्गिंटन डी. सी - अमेरिकेतील विस्कॉन्सिन (Wisconsin ) शहरात रविवारी सांयकाळी ख्रिसमस परेडमध्ये (Christmas parade) एका भरधाव "लाल रंगाची कार घुसली. यात 20 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. ही घटना सांयकाळी 4:30 (2230 GMT) वाजता घडल्याची माहिती आहे. वोकेशातील मिल्वॉकीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक आयोजित वार्षिक परंपरा असलेली ख्रिसमस परेड पाहण्यासाठी आले होते.
Christmas Parade Accident : ख्रिसमस परेडमध्ये घुसली भरधाव वेगात कार, 20 जणांना चिरडलं - ख्रिसमस
अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये सुरू असलेल्या ख्रिसमस परेड दरम्यान एक मोठा अपघात झाला. एका गाडीखाली चिरडून अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या भयंकर घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्टीवन हॉवर्ड यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, 12 मुलं आणि 23 जणांना शहरातील 6 रुग्णालयात दाखल केले आहे. गाडी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गाडी सुद्धा जप्त केली आहे. या भयंकर घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये गाडी भरधाव वेगात परेडमध्ये घुसताना दिसत आहे. आम्ही एक कार जवळून जाताना पाहिली आणि नंतर आम्हाला लोकांचा ओरडण्याचा मोठा आवाज ऐकू आला अशी माहिती अँजेलिटो टेनोरिओ यांनी दिली.
एक लाल रंगाची कार ख्रिसमस परेडमध्ये वेगात घुसली. या गाडीने 20 पेक्षा अधिक लोकांना टक्कर मारली. कारने अनेक लोकांना फरफटत नेले आहे. यात काही मुलांचाही समावेश आहे. तर काही जणांचा घटनेत मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही माहिती पोलीस प्रमुख डॅम थॉम्पसन यांनी दिली. थॉम्पसन यांनी मृत पावलेल्या लोकांची संख्या सांगितली नाही. जोपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना कळवले जात नाही. तोपर्यंत मृतासंदर्भातील माहिती जारी करण्यात येणार नाही.