वॉशिंग्टन डी.सी.(सांता मोनिका) - जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेत मोर्चे सुरू झाले आहेत. जॉर्ज फ्लॉइड आणि आत्तापर्यंत हत्या झालेल्या आफ्रिकन अमेरिकन नागरिकांच्या स्मरणार्थ शेकडो सर्फर्सनी 'द इंक वेल' येथे जमा होत श्रद्धांजली वाहिली.
जीवन साजरा करण्याची आणि जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल शोक करण्याची एक 'पॅडल आउट' नावाची एक हवाईयन परंपरा आहे. 'ब्लॅग गर्ल सर्फ' नावाच्या सर्फीग संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या श्रद्धांजली कार्यक्रमात २०० पेक्षा जास्त सर्फर्सनी सहभाग घेत सर्फिंग केले. समुद्राच्या लांटावर स्वार होत त्यांनी जॉर्ज फ्लॉइडचे स्मरण केले.