वॉशिंग्टन - चीन-भारताच्या सीमारेषेच्या स्थितीवर अमेरिका जवळून देखरेख करत आहे. ही समस्या शांततामय मार्गाने सुटावी, अशी आशा असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले, की चीनच्या कुरापतीपणाला थांबविण्यासाठी त्यांच्याविरोधात उभे ठाकणे हा एकमेव पर्याय आहे. चीनचा कम्युनिस्ट पक्ष हा त्यांच्या लोकांना आणि शेजाऱ्यांवर दबाव आणत असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मायकल पॉम्पेओ म्हणाले, की बीजिंगकडून सातत्याने देशात व विदेशात आक्रमकपणा दाखविला जात आहे. तैवानच्या सामद्रधुनी ते शिनजियांग, दक्षिण चीन समुद्र ते हिमालय, सायबर विश्व ते आंतरराष्ट्रीय संस्था अशा पद्धतीने आम्ही चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी सामना करत आहोत.