महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

हृदयद्रावक! अमेरिकेत कोरोनामुळे सहा आठवड्यांच्या बाळाचा मृत्यू...

गव्हर्नर नेड लामोंट यांनी ट्विट करत ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते, त्यामुळे त्याला वाचवण्यात यश आले नाही. त्यानंतर केलेल्या चाचणीने हे निष्पन्न झाले, की त्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती.

Six-week-old newborn dies of coronavirus in US: state governor
अमेरिकेत कोरोनामुळे सहा आठवड्यांच्या बाळाचा मृत्यू...

By

Published : Apr 2, 2020, 9:29 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील कोरोनांच्या बळींची संख्या वाढतच चालली आहे. मंगळवारी या विषाणूमुळे एका सहा आठवड्यांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. अमेरिकेच्या स्टेट ऑफ कनेक्टिकटच्या गव्हर्नरांनी ही माहिती दिली.

गव्हर्नर नेड लामोंट यांनी ट्विट करत ही माहिती दिली. गेल्या आठवड्यात या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा ते उपचारांना प्रतिसाद देत नव्हते, त्यामुळे त्याला वाचवण्यात यश आले नाही. त्यानंतर केलेल्या चाचणीने हे निष्पन्न झाले, की त्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. हे अतिशय हृदयद्रावक आहे. कदाचित कोरोनाचा हा जगातील सर्वात लहान वयाचा बळी असेल, असे ते म्हटले.

अमेरिकेमध्ये या विषाणूने आतपर्यंत सुमारे साडेचार हजार बळी घेतले आहेत. सुरुवातीला हा विषाणू केवळ वयोवृद्ध व्यक्तींसाठीच घातक असल्याचे सर्वांना वाटत होते. मात्र, तरुण व्यक्ती आणि लहान मुलांसाठीही हा तितकाच घातक असल्याचे हळूहळू समोर येत आहे.

कनेक्टिकटचे शेजारील राज्य असलेल्या न्यूयॉर्कला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. अमेरिकेतील एकूण बळींपैकी सुमारे २ हजार बळी हे एकट्या न्यूयॉर्कमध्ये आहेत.

हेही वाचा :कोरोनाच्या लढ्यात भारताची नेपाळ, मालदीवला वैद्यकीय मदत

ABOUT THE AUTHOR

...view details