वॉशिंग्टन :अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू अल्पसंख्यांकांची परिस्थिती चिंताजनक असल्याचे अमेरिकेच्या एका ठरावामध्ये म्हणण्यात आले आहे. अमेरिकन काँग्रेस या अल्पसंख्यांकांना अफगाणिस्तानमधून अमेरिकेत हलवण्याबाबत विचार करत असल्याचेही यात म्हटले आहे.
काँग्रेसच्या प्रतिनिधी जॅकी स्पेईअर यांनी आणखी सात प्रतिनिधींसोबत हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजमध्ये हा ठराव मांडला. हिंदू आणि शीख लोकांना अफगाणिस्तानमध्ये धार्मिक छळ आणि भेदभावाला सामोरे जावे लागत आहे. तसेच, त्यांची संख्याही धोक्यात आली असल्याचे यात म्हटले गेले आहे.