वॉशिंग्टन - एका तीन वर्षीय मुलाने गोळी झाडून आपल्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना अमेरिकेतील शिकागो येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षीय चिमुकला घरात असलेल्या खऱ्याखुऱ्या बंदुकीसोबत खेळत होता, यादरम्यान चुकून गोळी झाडली गेली आणि त्यात त्याच्या आईचा मृत्यू झाला.
सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये घडला घटना -
चिमुकल्याने झाडलेली गोळी महिलेच्या मानेवर लागली, यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण, तोपर्यंत खूप उशीर झाला होता, रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 12 मार्च रोजी घडलेल्या घटनेला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. शहरातील एका सुपरमार्केटच्या पार्किंगमध्ये शनिवारी संध्याकाळी ही दुर्घटना घडली.
हेही वाचा -Shocking News : 11 वर्षाच्या मुलीने दिला मुलाला जन्म