महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

उत्तर कॅरोलिनातील पुरात 7 ठार, 2 बेपत्ता

ग्रीनविले-स्पार्टनबर्गमधील एनडब्ल्यूएसच्या पूवार्नुमान कार्यालयाने गुरुवारी ट्विट केले की, एनसी पीडमोंट/ वेस्टर्न एनसी येथे आज सकाळी मुसळधार पाऊस आणि नद्या पात्राबाहेर पडल्यामुळे धोका वाढला असून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुराच्या पाण्यातून गाड्या न चालवण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तर कॅरोलिनात पूरस्थिती न्यूज
उत्तर कॅरोलिनात पूरस्थिती न्यूज

By

Published : Nov 13, 2020, 7:28 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या उत्तर कॅरोलिना राज्यातील पुरात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण बेपत्ता आहेत. पुरामुळे रस्ते व पुलांचेही नुकसान झाले आहे. सिन्हुआच्या वृत्तानुसार राज्यातील काही भागात गुरुवारपर्यंत सुमारे 10 इंच पाऊस झाला.

पश्चिम पायमोंट प्रदेशातील अलेक्झांडर काउंटीमध्ये 4 पूल आणि 50 रस्त्यांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा -होंडुरासमध्ये उष्णकटिबंधीय वादळ एटाने घेतले 57 बळी

दरम्यान, नॅशनल वेदर सर्व्हिसने (एनडब्ल्यूएस) शार्लोट आणि रॅले येथेही पूर येण्याची दाट शक्यता असल्याचे इशारे जारी केले आहेत.

ग्रीनविले-स्पार्टनबर्गमधील एनडब्ल्यूएसच्या पूवार्नुमान कार्यालयाने गुरुवारी ट्विट केले की, एनसी पीडमोंट/ वेस्टर्न एनसी येथे आज सकाळी मुसळधार पाऊस आणि नद्या पात्राबाहेर पडल्यामुळे धोका वाढला असून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती असल्याचे म्हटले आहे. त्यांनी पुराच्या पाण्यातून गाड्या न चालवण्याचा सल्ला दिला आहे.

उत्तर कॅरोलिना व्यतिरिक्त दक्षिण कॅरोलिना आणि मेरीलँडच्या पूर्वेकडील भागातही पूराचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा -इजिप्तमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सहा अमेरिकन नागरिकांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details