मेक्सिको सिटी - मेक्सिकोमध्ये शस्त्रधारी टोळक्याने केलेल्या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दक्षिणेला असलेल्या 'गुरीरो' राज्यामध्ये ही घटना घडली. मृतांमध्ये एका जवानाचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मेक्सिकोत सुरक्षा दल- शस्त्रधारी टोळक्यामधे गोळीबार, एका जवानांसह १५ जणांचा मृत्यू - गुरीरो राज्य मेक्सिको
मेक्सिकोमध्ये शस्त्रधारी टोळक्याने केलेल्या गोळीबारात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या दक्षिणेला असलेल्या गुरीरो राज्यामध्ये ही घटना घडली.
लुगाला शहरापासून ५ किमी दूर असलेल्या टेपोहिका भागामध्ये शस्त्रधारी टोळके असल्याची माहिती देणारा फोन ९११ क्रमांकार आला होता. त्यानंतर तेथे सुरक्षा दलांना पाठवण्यात आले होते. यावेळी झालेल्या गोळीबारामध्ये टोळक्यातील १४ जणांचा मृत्यू झाला. तसेच एका जवानाचाही मृत्यू झाला, अशी माहीती राज्याचे सुरक्षा सचिव राबर्ट अर्वर्झ हेरेडिया यांनी दिली.
काल (मंगळवारी) मेक्सिकोमध्ये शस्त्रधारी टोळक्याने केलेल्या हल्ल्यात १४ पोलिसांचा मृत्यू झाला होता. देशाच्या पश्चिमेकडे असलेल्या स्टेट ऑफ मिशोकन येथे ही घटना घडली. त्यानंतर ४८ तासांच्या आत देशामध्ये हिंसाचाराची दुसरी घटना घडली.