महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

बाह्यग्रहावर नासाकडून जीवनाचा शोध; पृथ्वीच्या मॉडेलचा करणार वापर - ozone in our atmosphere

सुर्याच्या स्पेक्ट्रमचे टेम्पलेट विकसित केले आहे. त्यामुळे पृथ्वीसारखे वातावरण बाह्यग्रहावर असल्यास ते समजू शकणार आहे.

सुर्याच्या स्पेक्ट्रमचा वेध
सुर्याच्या स्पेक्ट्रमचा वेध

By

Published : Aug 11, 2020, 4:09 PM IST

वॉशिंग्टन– सौरमालेच्या बाहेर जीवनाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञ हे पृथ्वीचा मॉडेल म्हणून वापर करणार आहेत. नासाच्या हबल स्पेसमधील टेलिस्कोपने चंद्रग्रहणाच्या काळात आपल्या वातावरणातील पृथ्वीचा ओझोन टिपला आहे. त्यामुळे अंतराळ शास्त्रज्ञांकडून बाह्यग्रहावर ओझोनचा शोध घेण्यात येणार आहे.

बाह्यग्रहावर जीवनाचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांकडून पृथ्वीसारख्याच चिन्हे असल्याच्या ग्रहांचा शोध घेण्यात येत आहे.

कोलोरॅडो विद्यापीठाचे संशोधक अॅलिसन यंगब्लड म्हणाले, की जीवनाचे अस्तित्व असणाऱ्या ग्रहाचा शोध घेणे हे नासाचे महत्त्वाचे ध्येय आहे. त्यामुळे जीवनाला मदत होवू शकते. मात्र एखाद्या ग्रहावर जीवन अस्तित्व आहे, हे कसे समजू शकणार आहे? त्यासाठी सुर्याच्या स्पेक्ट्रमचे टेम्पलेट विकसित केले आहे. त्यामुळे पृथ्वीसारखे वातावरण बाह्यग्रहावर असल्यास ते समजू शकणार आहे.

ओझोन हे जीवनासाठी आवश्यक आहे. कारण, ते पृथ्वीसाठी महत्त्वाचे संरक्षक आहे. त्यामुळे ओझोन असणे हे एखाद्या ग्रहावर जीवन असण्याचे चिन्ह असू शकते. ओझोनचा थर सापडणे महत्त्वाचे आहे. कारण ते ऑक्सिजनच्या रेणुंचे उत्पादन आहे.

दरम्यान, नासाने मंगळावरही जीवनाचे अस्तित्व शोधण्यासाठी यान पाठविले आहेत. मात्र, अद्याप जीवनाचे अस्तित्व पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र आढळलेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details