वॉशिंग्टन डी.सी -शास्त्रज्ञांना म्यानमारमध्ये 10 कोटी वर्षांपूर्वीचा खेकडा सापडला आहे. हा खेकडा केवळ पाच मिलीमीटर आकाराचा आहे. अंबरमध्ये सापडलेल्या या खेकड्याला शास्त्रज्ञ जिवंत खेकडा मानत असून त्याला 'अमर खेकडा' म्हणत आहे. अंबरमध्ये कैद झाल्यामुळे या खेकड्याचा देह अजूनही सुरक्षित आहे. या अमर खेकड्याचे नाव 'क्रेटस्परा अथानाटा' आहे.
संशोधकाचा असा विश्वास आहे की, क्रेटस्परा हा समुद्री खेकडा ही नव्हता किंवा तो नेहमी जमिनीवरही राहणारा नव्हता. एखाद्या झाडाच्या राळेत अडकलेला असा पहिलाच जीव आढळला आहे. आतापर्यंत अशा राळेत केवळ किटकच आढळलेले आहे. हे खेकडे घरटी बनवून राहतात. सागरी जीवनाच्या शोधातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी प्रगती मानली जाते. ज्युरासिक पार्क चित्रपटाच्या सीनप्रमाणे ही माहिती कुतूहल निर्माण करणारी ठरलेली आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटी तसेच यूनान, रेजिना, लिन, ड्यूक, येल आणि चायना युनिव्हर्सिटी मधील 8 संशोधकांचा या संशोधनात सहभाग आहे.