महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

ट्रम्प यांचा भारत दौरा ठरणार फुसका बार; मोठे द्विपक्षीय व्यापारी करारास बगल - डोनाल्ड ट्रम्प अहमदाबाद भेट

'भारताबरोबर व्यापारी योजनांची घोषणा केली जाणार आहे. मात्र, मोठ्या योजनांची घोषणा नंतर केली जाणार आहे', असे ते मंगळवारी माध्यम प्रतिनीधींशी बोलताना म्हणाले. २४ आणि २५ फ्रेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प,trump india visit
डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Feb 19, 2020, 10:41 AM IST

Updated : Feb 19, 2020, 12:43 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात व्यापारासंबंधी मोठ्या योजनांची घोषणा केली जाणार नाही. मात्र, भारताबरोबर भविष्यात मोठ्या व्यापारी घोषणा केल्या जातील, असा खुलासा ट्रम्प त्यांनी केला. मोठ्या घोषणा अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी किंवा त्यानंतरच्या काळात केल्या जातील, हे निश्चित नसल्याचे ते म्हणाले. भारत-अमेरिका व्यापाराबाबात ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली नसल्याचे ते म्हणाले.

'भारताबरोबर व्यापारी योजनांची घोषणा केली जाणार आहे. मात्र, मोठ्या योजनांच्या घोषणा नंतर केल्या जाणार आहेत', असे ट्रम्प मंगळवारी माध्यमप्रतिनीधींशी बोलताना म्हणाले. २४ आणि २५ फेब्रुवारीला डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी व्यापारी सवलती आणि योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, मोठ्या घोषणा केल्या जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

भारत दौऱ्यावर जाण्याआधी 'ट्रेड डिल'ची घोषणा केली जाणार आहे का? असे विचारले असता, भारताबरोबर नक्कीच व्यापारी करार होणार आहे. मात्र, ते निवडणुकीपूर्वी होतील की नाही हे माहित नसल्याचे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लिंग्टझर ट्रम्प यांच्यासोबत भारतात येण्याची शक्यता कमी आहे. रॉबर्ट लिंग्टझर भारताबरोबरच्या व्यापार चर्चेतील महत्त्वाचे सदस्य आहेत. मात्र, ते ट्रम्प यांच्याबरोबर भारतात येणार आहेत की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली नाही.

भारत-अमेरिका व्यापाराबाबात ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारताकडून आम्हाला चांगली वागणूक मिळाली नसल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी आवडत असल्याचे ट्रम्प म्हणाले. भारत भेटीसाठी उत्सुक आहे. विमानतळापासून सर्वोत मोठ्या स्टेडियमच्या उद्धाटनस्थळी जाताना ७० लाख नागरिक रस्त्याने आणि स्टेडियममध्ये स्वागताला असतील असे मोदींनी सांगितल्याचे ते म्हणाले. दोन्ही देशांमधील व्यापाराचे चित्र सकारात्मक असल्याचे भारत अमेरिका व्यापारी फोरमने सांगितले.

Last Updated : Feb 19, 2020, 12:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details